रात्र सारत आलेली. महाद्या डोक्याला हात लावून सोप्यात बसून होता. समोर म्हातारी आईही आता काय करावं या काळजीत बसलेली.
"गेली तीन वर्ष असाच सगळं चालू आहे. चार सहा महिने कष्ट करायचे अन ऐन सुगीच्या दिवसात या लढाया ! कासं जगावं माणसाने ? "
पार्वती आतून येत म्हणाली, "आता किती वेळ असं डोकं धरून बसणार आहात? वाचलीत तितकी कणसं तरी कापून आणा घरात."
आई ओरडली, " आगं पण ते शिपाई घुसू तरी देतील का शेतात? उगा महाद्याला मार पडायचा."
तरी महाद्या उठलाच, " बरोबर आहे. शिपाईगडी आता झोपले असतील तोवरच झपझप जमतील तेव्हढी आणतो घरात." अन मग पार्वतीही दोन पोती घेऊन त्याच्या सोबत बाहेर पडली.
दोघंही अंधारातच शेताकडे जाऊ लागली. वाटेतच शिपायांचा तंबू होता. पण तिथे शांतता होती. कालच्या लढत पार थकलेले शिपाई.
दोघं शेतात पोहोचले. भराभर हात चालवत त्यांंनी बरीचशी कणसं पोत्यात भरली. कोंबडा आरवायच्या आत परतायला हवं होतं. जर का शिपायांंनी बघितलं, तर सगळंच हातून जाणार होतं. दोघं भराभर पण अजिबात आवाज न करता परतले.
आई दारातच वाट बघत उभी होती. लांबूनच दोघांंना पोती घेऊन येताना पाहून ती आत वळली. भराभर कणगी वरची ताटी बाजूला केली. आतून जरा फडकं फिरवलं. तोवर दोघं आलीच.
" चला पटापटा ओता पोटी कणगीत . "
"आहो पण आई काणसं, दाणे ओले आहेत. असाच कसं भरणार? "
" पार्वती, आई म्हणते तसं कर. बाहेर उन्हात ठेऊन सुकवणं शक्य तरी आहे का? त्या डोमकावळ्यांंची नजर अडली कि झालाच कल्याण !"
पार्वतीला पटलं. भरभर पोती रिकामी केली. ४-८ कणसं वर ठेवून बाकी सगळी आत ढकली. अन ताटी मातीने लिंपून टाकली.
तिघांही घामाघूम झालेले. हाशहुश करत तिघेही बसून राहिले.
चुलीजवळची धग वाढवून पार्वतीने कणसं चुलीजवळ ढकलली. दुपारपर्यंत जरा कोरडी होऊन निदान ज्वारीची लापशी तरी बनली असती . दोन दिवस ढकलता येतील आता.
दोन दिवस असंच करून महाद्या, पार्वतीने शेतातली शक्य तितकी कणसं घरात आणली.
अन मग दहा दिवसांनी लढाई संपली. आसपासही सगळी शेतं शिपायांंनी अक्षरश: कापून नेली. सारा गाव बोडका करून सैन्य परतलं. आता वर्ष कसं निभायचां या काळजीने सारं गाव काळजीत पडला.
जरा आलबेल झाल्यावर पार्वतीने कणगी उघाडली. आतून थोडी कणसं काढली. अन तिथेच ती रडायला लागली. आई, महाद्या धावत आले. पार्वतीने कणसं पुढे केली. सगळ्यावर बुरा आलेला. ओली कणसं तशीच कणगीत भरल्यामुळे बुरशी धरलेली. महाद्या पुढे सरसावला. भरभर सगळी कणसं बाहेर काढू लागला. पण हाय रे कर्मा. सगळं धान्य खराब होऊन गेलेलं.
हेही वर्ष असच हालाखीचे गेलं.
पण मग कशी कोणजाणे लढाया थांबल्याचं. कोणी म्हणे टोपीकरांचं राज्य आलं.कोणी म्हणे गोऱ्या लोकांचं राज्य आलं. काही का असेना सततची युद्ध थांबली हे महाद्या पार्वती आणि आईला बरं वाटलं. एक वर्ष तसं बरं गेलं. पण पुढच्या वर्षी मोठा दुष्काळ पडला. पेरलेली रोपं जाळून गेली तरी पाऊस पडलाच नाही. आवारात जो थोडा भाजीपाला व्हायचा तोही झाला नाही. विहिरीचं पाणीही पार रसातळाला गेलं. गावात सगळ्यांंंचीच अशी परिस्थिती होती. कोण कोणाला मदत करणार असे झाले. काही लोक गोऱ्या सरकारला शिव्याशाप देऊ लागले. काहींना हा देवाचा कोप वाटला. पण यातून काही मार्ग काढायला हवा होता.
महाद्याचा लांबच्या भावाचा, संपतचा सांगावा आला. की त्याच्या गावात सरकारने रस्त्याचे काम काढले आहे. ये म्हणून. आई, पार्वतीला काही पटेना. पण महाद्याला नुसतं बसून राहण्यापरीस मिळेल ते काम करावं वाटत होत, शेवटी महिनाभर महाद्याने जाऊन पाहायचं. जमलं तर ठीक नाही तर परत यायचं ठरवलं.
प्रवास तसा मोठा होता. पण गावातल्या चार जणांनी जायचयं ठरवलं. या प्रवासात सर्वात मोठी अडचण झाली ती आंघोळ, पूजा, सोवळ्या ओवळ्याची. सगळंच बासनात गुंडाळून ठेवावं लागणार होतं. पण देवानेच ही परिस्थिती आपल्यावर लादली तर तोच निभावून नेईल असा विचार करून चौघं निघाले. तसंही जीव वाचला तर देवधर्म, जीवच नाही वाचला तर कसले रितीरिवाज? घराचे, गावताले इतर लोकं यांंच्या विरोधाला त्यांंनी बाजूला ठेवले.
अन मग एक बैलगाडी घेऊन निघाले. मजल दरमजल करत वाटेत जे काय मिळेल ते शिजवून खात चौघं अखेर मुंबईला पोहोचले. महाद्याच्या भावाच्या घरी पोहोचले. तिथे अजूनही काही स्नेही आले होते. सकाळी संपत बरोबर महाद्या आणि त्याचे चार मित्र, इतर स्नेही सगळे गोऱ्या साहेबाच्या कचेरीत पोहोचले. तिथे मोठीच गर्दी होती. गावागावातून अनेक गोरगरीब काम मिळावं म्हणून आलेले. एक एक करत सगळ्यांची नावं गोरा साहेब लिहून घेत होता. महाद्याचे नाव लिहून घेताना किती माणसं विचारल्यावर महाद्याने पटापट त्याची माणसं मोजून आकडा सांगितला. साहेबाने लगेच विचारलं कि महाद्याला हिशोब येतो का? महाद्या गावी असताना लहानपणी लिहाय वाचायाला, हिशोब करायला शिकला होता. त्याने लगेचच मान हलवली. साहेबाने त्याला थांबायला सांगितले.
खरे तर सगळे घाबरले. पण संपतने धीर दिला. म्हणाला महाद्याला वेगळं काम देतील.
दुपारची सुटी झाली साक्षी सगळी पांगली. महाद्या अन संपत वाट बघत थांबून राहिलेले. तितक्यात गोऱ्या साहेबाच्या कारकुनाने त्या दोघांना बोलावले.
कारकुनाने महाद्याला मोठया साहेबाकडे नेले. संपताला बाहेरच उभे केले. आत गेल्यावर महाद्या एकदम बुजला. मोठा दिवाणखाना, त्यात गालिचे, मोठी मोठी आसनं . अन आता सैनिकी पोषाखातला गोरा साहेब! मोठा साहेब त्याच्या भाषेत काहीतरी बोलायला लागला. महाद्या घाबरला. पण सोबतच्या कारकुनाने सांगितले की तुझे नाव सांग. तशी महादेव असे पटकन बोलून त्याने नमस्कार केली. मॅहाडेव. हम. पुन्हा त्याच्या भाषेत काही विचारले. नोकराने सांगितले की तुला हिशोब करता, लिहिता येतो का? महादेव पुन्हा होय साहेब म्हणाला. मग साहेबाने एक कागद पुढे केला. नोकराने त्यात बघून विचारले कि दहा माणसांना प्रत्येकी चार आणे दिले तर किती होती? महाद्याने मनातल्या मनात आकडे मोड केली. चार वेळा बोट मुडपली. अन उत्तराला. दोन रुपये अन अर्धा रुपया साहेब. मोठा साहेब हसला. आणि काही तरी म्हणाला. महाद्याने कारकुनाकडे बघितलं. तो म्हणाला अरे आभार मान साहेबांचे. त्यांंनी तुला नोकरीवर ठेवलाय. तेही सरकारी कार्यालयात. महिना चार रुपये मिळतील. सरकारकडून दोन गणवेषही मिळतील.
महाद्याला एक क्षण कळलंच नाही. पुढच्या क्षणाला तो साहेबाच्या पायाशी वाकला. साहेब मागे सरकत नो नो म्हणाला. महाद्या गोंधळला. कारकून म्हणाला अरे त्यांना वाकून नाही, नुसतं झुकून नमस्कार करत जा. महाद्याने तसा नमस्कार केली. मग साहेब काही म्हणाला तसं कारकून "यास सर" म्हणत महाद्याला हाताला धरून बाहेर पडला.
बाहेर संपत काळजी करत बसलेली. त्यालाही कारकुनाने सगळे समजावून सांगितले. उद्या सकाळी बरोब्बर ९ वाजायला कार्यालयात महाद्याला घेऊन ये बजावले.
सगळे परत आले. बहुतेक सगळ्यांना रस्त्याच्या कामावर नेमले होते. महाद्याला कार्यालयात. सगळ्यांनाच आनंद झाला. इतके कष्ट घेऊन आलो. पण त्याचं फळ मिळालं असं वाटलं.
दुसऱ्या दिवशी सगळे लवकरच उठले. अन सगळे यावरून, भाकरतुकडा घेऊन कामावर निघाले. संपत आणि महाद्या मोठ्या साहेबाच्या कार्यालयाजवळ आले. महाद्याला तिथे सोडून संपत आपल्या कामावर गेली. महाद्या कार्यालयाच्या बाहेर वाट बघत बसला. थोड्याच वेळात कारकून आला. त्याचे नाव श्रीपती होते. श्रीपतीने दरवाजा उघडला अन दोघे आत गेले. म्हाद्याने विचारले काय काम करू ? श्रीपती म्हणाला हे बघ या इथे बस. हे कागद, हि दौत आणि लेखणी. आता साहेब येतील. मग ते सांगतील ते करू. पण आता तुला इंग्रजी भाषा थोडी शिकायला हवी. कोणती भाषा?
इंग्रजी म्हणजे साहेबांची भाषा, श्रीपती हसत म्हणाला. बार साहेब. अरे, मी कुठे साहेब? मला नुसतं< श्री म्हण . महाद्याने मान डोलावली. पण मी साहेबाची भाषा कशी शिकणार? मला काहीच माहिती नाही. घाबरू नको. मळालाही कुठे येत होती? पण आपले साहेब फार हुशार माणूस. ते बरोब्बर शिकवतात. अन मी हि आहे ना. मी मदत करेनच. अजिनाही महाद्या गोंधळलेलाच होता. पण त्याची नवीन शिकायची तयारी होती. तेव्हढ्यात बाहेर बग्गीचा आवाज आला. साहेब आले बार. उभं राहून जरा वाकून सलाम करायचा.हा असा. म्हणत श्री ने दाखवले. साहेब दारात आले तसे दोघांनीं वाकून सलाम केली.
"गुड गुड. यु आर या न्यू वर्कर." महाद्याकडे बघत साहेब म्हणाले. महाद्याचा कोरा चेहरा बघून म्हणाले. "तु नवीन काम करणारा न?"
महाद्या चकितच झाला. साहेब आपली भाषा बोलतोय बघून. पटकन "होय महाराज" असं म्हणाला. अन मग जीभ चावून "होय साहेब" म्हणाला. साहेब पुन्हा हसला.
"सीट सीट. बस"
आता श्री पुढे झाला अन काही कागद साहेबाकडे दिले. त्या दोघांचे बोलणे फारसे कळले नाही. पण "हे नवीन माणसाला दे" असे सांगितले ते कंळले. मग साहेब म्हणाला "तुझे नाव ?"
"मी महादेव साहेब."
"हा, हा महादेव. यावर दिलेले हिशोब एका नवीन कागदावर नीट लिही. डोन्ट मेक मिस्टेक. चुका करू नको."
महादेवाला आनंद झाला. "जी साहेब" म्हणत त्याने कागद हात घेतला.
खूप सगळे आकडे अन नावं त्यावर होती.
"श्री डॉ नीडफूल अन हेल्प हिम. महादेवाला मदत कर."
महादेवाने काही शब्द मनात पक्के केले. वर्कर म्हणजे काम करणारा. सीट म्हणजे बस. हेल्प म्हणजे मदत. मुळचा हुषारच होता महादेव. आणि साहेब हवं तिथे मराठी शब्दही वापरात होता.
हळुहळू महादेव मुंबईत रुळाला. काही महिन्याने त्याने एक खालीही घेतली अन आई, पार्वतीला गावाहून आणले. आई अजिबात नव्हती. पण तिला एकटीला ठेवणे शक्य नव्हते. शेती एका भावकाकडे कसायला दिली अन सगळे मुंबईतच आले. मुंबईतील हवा, राहणीमान यांच्याशी पार्वतीने जुळवून घेतलं. पण आई मात्र कुरकुरताच राहिली.
कार्यालयात महादेवाने छानच प्रगती केली. साहेबाची पूर्ण मर्जी त्याने संपादन केली. आता साहेब त्याला इंग्रजी लिहाय वाचायाला शीक म्हणू लागला. काम जसे वाढले तसे साहेबाला एक विश्वासू माणूस हाताखाली हवा होता. पण इंग्रजी शिक्षण घेणे आपल्या धर्मात चालेल का अशी भिती त्याला वाटली.
मग साहेबाने महादेवाला एका मोठ्या न्यायाधिशाकडे पाठवले. न्या. रानडे जातीने ब्राह्मण असून संस्कृतचे गाढे विद्वान होते. अन इतकाच नव्हे तर इंग्रजी शिक्षण घेतलेले, साहेबाच्या देशात जाऊन बॅरिस्टर झालेले होते. त्याच मुळे ते कोर्टात मोठे न्यायाधीश झाले होते.
एका रविवारी सकाळी, वेळ ठरवून महादेव न्यायाधीश रानडेंच्या बंगल्यावर गेला. खरे तर भीत भीतच तो आलेला. आईने तर त्याला शपथ घातली की तिथे पाणी पण पिऊ नको, बाटशील. पण बंगल्यावर जाताच त्याला संस्कृतमधले श्लोक ऐकू येऊ लागले. त्याला वाटले आपला पत्ता चुकला. पण बाहेर पाटीवर तेच नाव होते. शेवटी धीर करून तो आत आला. ओसरीवर जाऊन आवाज देणार तोच, "महादेव का रे, ये ये. हातपाय धु तोवर मी आलोच." असा आवाज आतून ऐकू आला. महादेव चपला काढतो तोवर आतून एक चिमुरडी पाण्याचा गडू घेऊन अली. महादेवाने हात पाय धुतले, चेहऱ्यावर हात फिरवला अन दोन घोट पिऊन धोत्र्याच्या सोग्याला तोंड पुसले. चिमुरडीने गडू परत घेतला अन ती आत पळाली. तोवर न्यायाधीश महाराज बाहेर आले. शुभ्र पायघोळ धोतर, वरती सदरा. डोक्यावर शेंडी. गळ्यातली तुळशीची मान हातात धरून ते पटापट पुढे आले. ते झोपाळ्यावर बसले. तशी महादेवाने वाकून नमस्कार केली. "आयुष्यमान भाव. बैस, बैस त्या बाकावर."
"हं तुझं नाव महादेव न? मेयो साहेबांच्या कार्यालयात आहेस न. छान काम करतोयस असं म्हणाले साहेब." हसत न्यायाधीश म्हणाले. "जी महाराज."
"अरे, महाराज नको, सगळे मला अण्णासाहेब म्हणतात तसाच म्हण. हा तर तुला इंग्रजी शिकायची का बरं भीती वाटतेय?"
"भीती नाही पण आपला धर्म तशी परवानगी देतो का? उगाच वाळीत बिळीत पडलो तर कसं करणार ?"
न्यायाधीश जोरात हसले. "अरे, माझ्याकडे बघ. मी पडलोय का वाळीत? मी इंग्रजी लिहितो, कोर्टात इंग्रजीतूनच बोलतो, इंग्रजी साहेबा बरोबर वावरतो. माझा नाही हो धर्मबीर्म बुडाला. कोकणस्थ ब्राह्मण आहे, अगदी रोज पूजा अर्चा, संध्या सगळं नीट करतो. अगदी गणपती बसवणे, सगळे सणवार सगळं नीट करतो की. अन धर्मातला कोणताही नियम या आड येत नाही. बिनधास्त शिक इंग्रजी. काहीही आडचण आली, कोणी अडवलं तर माझ्याकडे ये, माझं नाव सांग.
आज काळ असा आला आहे की जितकं मिळेल तितकं अन ते ते शिकावं माणसाने!"
No comments:
Post a Comment