Tuesday, August 17, 2021

भारत स्वतंत्र झाला आणि ...

१.

भारताला स्वातंत्र्य मिळाले. कशामुळे मिळाले? खरं तर अनेक कारणे आहेत. स्वातंत्र्य लढा हे तर आहेच. त्यातही कितीतरी पदर! मवाळ राजकारणापासून जहाल अन अहिंसेपर्यंतची वाटचाल करणारी काँग्रेस आणि त्यामागे उभा  असणारा  प्रचंड  मोठा जनसमुदाय. क्रान्तिकारक आणि त्यांच्या विविध संस्था यांचेही कार्य मोठे. सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना यांचे कार्य. यातील बहुतेक महत्वाचे तपशील आपल्याला माहिती असतात. अनेक चळवळी , अनेक लढे, अनेक समर्पण, नेक क्रान्तिकारक घटना यांचा अगदी आपल्या अभ्यासक्रमातही समावेश असतो.किंवा आसपास चालेल्या चारचा, लेख, वाद या सर्वातून हे सगळन आपल्यापर्यंत पोहचताच असतं. पण अशी अनेक कारणं आहेत जी माहिती असून वा त्यातील तपशील माहिती नसल्याने आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. आणि मग त्यामुळे स्वातंत्र्यानंन्तरच्या अनेक घडामोडींचा अर्थ म्हणावा तसा लावता येत नाही. अनेकदा विविध ठिकाणाहून होणारा माहितीचा भडीमार कधी कधी तपशिलांचा लावलेला चुकीचा अर्थ आणि त्यांची तोडमरोड अनेकदा आपल्या मनात गोंधळ निर्माण करते. आपल्याकडे तपशील नसतात मग आपण समोरचा जे सांगतो आहे सहजी स्वीकारतो. कारण त्यावर साधक बाधक विचार करण्यासारखी संधी आपल्याला नसते. हे टाळण्याचा हा एक प्रयत्न!

भारतावर खऱ्या अर्थाने ब्रिटिशांचे राज्य सुरु झाले ते १८१८ पासून. पण त्याच्या कितीतरी आधी मुंबई प्रांतामध्ये ब्रिटिशांची कारकीर्द सुरु झाली होती. ब्रिटनवरून अनेक तरुण प्रशाकीय अधिकारी भारतात येत. पण त्यांना ना इथली भाषा येत होती, ना इअथल्या संस्कृतीचा काही अंदाज होता. या पूर्ण अनोळखी लोकांवर राज्य कसे करायचे हा प्रश्न होता. साधा वसूल जमा करायचा तर इथल्या लोकांचे हिशोब, आकडेवारी आणि ब्रिटिशांची  हिशेब आकडेवारी हि पूर्णतः वेगळी होती. जमीन मोजणीची पद्धती वेगळी होती, त्याची परिमाणं वेगळी होती. या सगळ्यातून मार्ग काढून त्यांना इथे राज्य करायचे होते. मग यावर मार्ग म्हणून काही ब्रिटिशांनी इथली भाषा शिकून घेतली. अनेक डिक्शनरी तयार केल्या. त्यातून ब्रिटिश प्रशाकीय वर्गाला इथली ओळख होऊ लागली. परंतु राज्य करताना केवळ ब्रिटिश अधिकारी  पुरेसे पडणार नव्हते. त्यांच्या हाताखाली मोठा कारकुनी वर्ग हवा होता. यासाठी मग ब्रिटिशांची भाषा, त्यांचा कारभार ज्या प्रकारे चालतो ती पद्धती, त्यासाठी लागणारे गणित, इथल्या लोकांना शिकवायला त्यांनी सुरुवात केली. 

ब्रिटिशांनी काही नवीन यंत्र सोबत आणली होती. प्रशासन चालवताना त्याचा उपयोग होणार होता. हि यंत्र चालवायला इथल्या  लोकांना शिकवायची तर त्याबद्द्दलची माहिती देणंही भाग होतं. यासाठी पाश्चात्य शास्त्र शिकवली जाऊ लागली. हा नवीन पाश्चात्त्य  शिक्षण  घेतलेला वर्ग आपल्या विचारांशी जोडला जायचा तर त्याच्या मानसिकतेत आणि बौद्धिक विचारप्रक्रियेत बदल व्हायला हवा. त्यासाठी पाश्चात्त्य  तत्वज्ञान, इतिहास याही विषयांचा अभ्यासक्रमात समावेश झाला.  भारता एक नवीन वर्ग हळूहळू निर्माण होऊ लागला.  भारतीयांशी परंतु  बौद्धिक साधर्म्य ब्रिटिशांशी असा हा नवीन वर्ग साधारण एकोणिसाव्या शतकात भारतात उदयाला आला. यालाच मध्यमवर्ग म्हणून संबोधले गेले. 

या मध्यमवर्गाने जवळ जवळ १२० वर्ष बजावलेली कामगिरी हीही स्वातंत्र्य मिळण्यासाठी कारणीभूत ठरली. म्हणून याचा इतका सविस्तर उल्लेख!

आता या भारतीयांनी का बरं  हे पाश्चात्य  शिक्षण  घेतले? ब्रिटिशांनी इथे पाश्चात्य शिक्षण सुरु केले कारण त्यामना प्रशासनासाठी कारकून हवे होते. पण भारतीयांना काय गरज पडली हे शिक्षण घेण्याची? 

ब्रिटिशांचे राज्य येथे सुरु झाले. त्यांचा प्रशाकीय वर्ग येथे आली. येथील जुन्या राजवटी संपल्या. त्या राजवटीतील कारकून मंडळी एका अर्थाने बेकार झाली. पूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या दरबारी काम करत असताना मिळत असणारा तनखा, जमिनी, मेहनताना आता थांबला. पूर्वीचे देशपांडे, कुलकर्णी, देशमुख, चिटणीस हि आणि अशा पदांवरची मंडळी आता कामाशिवाय उपाशी राहू लागली. हि मंडळी भरातीय शिक्षण  असणारी होती. अक्षर ओळख, लेखन कला , गणित, हिशोब या सगळ्यात तरबेज होते. परंतु हे सगळ त्यांना भारतीय भाषणांमध्ये येत होत, पण आता ब्रिटिश काळात या सगळ्या ज्ञानाचा उपयोग त्यांना करता येईना. कारण नव्या राज्यकर्त्यांची भाषा वेगळी होती, त्यांची गणिताची, हिशोबाची पद्धत वेगळी होती. जर जुने काम मिळवायचे तर नव्या राजवटीतल्या पद्धती, भाषा शिकणे आवश्यक होते. आपला कामधंदाच गेलेल्या या वर्गाने आपले काम परत मिळवण्यासाठी मग हे पाश्चात्य शिक्षण घ्यायला सुरुवात केली. अशा रीतीने पोटापाण्यासाठी का होईना भारतातील माध्यम वर्गाने ब्रिटिशांनी दिलेले शिक्षण  घ्यायला सुरुवात केली. 

इंग्रजी भाषा, ब्रिटन तसेच युरोपमधील इतर देशांचा इतिहास, पाश्चात्य पद्धतीचे  गणित, पाशात्य शास्त्र या सर्वाचा अभ्यास या मध्यमवर्गाने केला. 

(पुढे चालू...)