अमेरिका प्रगत वाटते खरी पण तिथेही प्रचंड तफावत आहे. प्रामुख्याने शिक्षण आणि व्यवसाय या क्षेत्रात.
एक वर्ग आहे, जो लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून
मोठा आहे. हा प्रामुख्याने शेती करणारा आहे. भले मोठमोठी यंत्र दिमतीला असतील पण वृत्ती गावंढळच. शिक्षणही कमी. जोडीने ख्रिश्चन धर्म, चर्च यांचा मोठा धार्मिक पगडा. समाज मानस बरचसं मागासच आहे या वर्गाचं. हाच वर्ग बहुतांश मोठ्या प्रदेशात पसरला आहे. अनेक राज्यच्या राज्य हाच नागरिक दिसतो. परंपरागत, शेतकरी, नव्याला नाकारणारा, धर्माला चिकटून असणारा, जुन्या रुढी बाळगणारा. हा झाला अमेरिका( जसा भारत)
अन दुसरा वर्ग आहे तो शहरी, सुशिक्षित, कायदेक्षेत्रातील, उद्योगपती, मोठमोठी ऑफिसेस, फॅशन इंडस्ट्री, गँबलिंग इंडस्ट्री, फार्मसुटिकल, ऑटो इंडस्ट्री... वगैरे. हा समाज सुधारक, सुशिक्षीत, पैसेवाला, सरकारवर प्रभाव पाडणारा, धर्माचे प्राबल्य कमी असणारा, ख्रिश्चन, ज्यु, हिस्पॅनिक, एशियन वगैरे. यांच्या हातात आर्थिक, कायदेशीर, राजकीय पॉवर आहे. हा युनायटेड स्टेटस (जसा इंडिया)
व्हाईट सुप्रमसी आणि मेल सुप्रिमसी. दोन्ही पहिल्या गटाला महत्वाची वाटते. दुसऱ्याला नाही.
अजूनही बरेच फरक क्वाईन करता येतील. जे मांडले ते महत्वाचे काही.
तर अमेरिकोतला पहिला वर्ग जो आहे त्याला ट्रंप आवडतो. कारण तो परंपरा, रुढी, धर्म, शेतकरी यांना उचलून धरतो.
तर दुसऱ्या वर्गाला म्हणजे शहरी वर्गाला तो नको आहे.
आता तिथल्या सरकार निर्मितीत दोन मुख्य भाग आहेत. राष्ट्रपती आणि सिनेट. दोन्हीची निवडणूक प्रक्रिया वेगवेगळी.
राष्ट्रपती निवडणुकीमधे प्रत्येक राज्याला वेगवेगळ्या इलेक्ट्रोलर कॉलेजच्या सीटस आहेत. उदा. कॅलिफोर्निया 75 तर अलास्काला 3. असं व्हेरिएशन आहे.
समजा कॅलीफोर्नियात डेमोक्रॅटिकचे 50 आणि रिपब्लिकनचे 25 निवडून आले तरी मेजॉरिटी डेमो ची तर सगळ्याच्या सगळ्या 75 डेमोला जातात.
राष्ट्रपती उमेदवाराच्या अटी
1. जन्मत: अमेरिकन हवा
2. 35 वर्ष वय हवं
3. अमेरिकेचा 14 की 15 वर्ष रहिवासी हवा
बस, आता इतकं पुरे.
No comments:
Post a Comment