![]() |
नेटवरून साभार |
जगातील सृजनशील चंद्रकोर म्हणून ओळखला जातो तो भूभाग म्हणजे मेसोपोटेमिया! मेसोपोटेमिया चा मुळात अर्थच दोन नद्यांमधील भाग असा आहे.
टायग्रिस आणि युफरीतीस या नद्यांच्या दोआबात वसलेली संस्कृती म्हणजे मेसोपोटोमिया संस्कृती. आजच्या कुवेत, इराक आणि सीरिया या देशामच्या भूमीवर हि संस्कृती सुमारे ५००० वर्षांपूर्वी उदयाला अली अन समृद्ध झाली. बारा हजार वर्षांपूर्वी पासून या भूभागात मानवाने वसाहत केलेली आढळते. या दोन नद्यांचे मुबलक पाणी आणि तेथील सुपीक जमिनी मुळे या ठिकाणी मानवी वसाहत स्थिरावत गेली.
या नद्यांच्या किनारी, या नद्यांच्या लहान लहान प्रवाहांच्या काठावर या टोळ्या राहू लागल्या. अस्मयुगीन माणूस शेतीचा शोध लागल्यावर कसा नद्यांच्या जवळ वसाहत करू लागला हे आपण मागे बघितलेच आहे.
अनेक टोळ्या या भूभागात वसाहत करून राहू लागल्या. या टोळ्यांमधूनच ६ हजार वर्षांपूर्वी याती ल काही शहरे विकसित होत गेली. इ स पूर्व चार ते साडेतीन हजार च्या सुमारास उर, उरुक , बॅबिलिन, अक्कड असुर अशी काही गावे मोठी झाली. सत्तेसाठी स्पर्धा असणारी ही शहरे होती. एका काळात अक्केडियनांनी यांवर वर्चस्व मिळवलं, तर काही काळानंतर अक्केरीयन आणि बॅबिलोनियन अशी दोन साम्राज्ये निर्माण झाली. युद्ध- स्पर्धा चालू असूनही या राज्यामध्ये प्रगतीही झाली. अनेक मोठमोठ्या इमारती बांधल्या गेल्या. राजवाडे, मंदिरे याला ते झिगुरात म्हणत, देवाशी संवाद साधण्यासाठी हि झिगुरात असत.
मानव जसजसा एका ठिकाणी शिरावर गेली, त्याची शेती विकसित झाली. तस तसा त्याच्या जगण्यासाठीचा लढा कमी होत गेला. अन्नधान्य मिळवण्यासाठीची त्याची रोजची धावपळ आता कमी झाली. शेती करून वर्षभराचे अन्नधान्य साठवणे आता त्याला जमू लागले. स्वाभाविकच थोडे स्थैर्य आणि मोकळा वेळ त्याला उपलब्ध झाला. याचाच उपयोग त्याने अनेक नवीन गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी वापरला. त्यातून अनेक शोध, माहिती, ज्ञान त्याने प्राप्त केले.
यातूनच या संस्कृतीने अनेक बाबतीत प्रगती केली. गणित, खगोल, काळ, वर्ष यांची विभागणी. यातील अगदी महत्वाची प्रगती होती ती म्हणजे लेखन पद्धतीची. आपली माहिती संग्रहित करून ठेवणे या संस्कृतीला जमले. त्याच मुळे आपल्याला या संस्कृतीची तपशीलवार माहिती मिळते. इ स पु ३२०० सुमारास उदयाला आलेल्या या लेखन पद्धती ला क्युनिफार्म असे संबोधले जाते. ओल्या मातीच्या पाटी वरती लाकडी त्रिकोणी आकाराच्या काडीने हि लिहिली जाई. बाबिलोनियातील राजा हम्मुराबी याचे राज्यशासनाची कायदेसंहिता हि या लिपीत लिहिलेली सर्वात जुनी अन महत्वाची कायदेसंहिता .
या संस्कृतीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यांनी बांधलेल्या कमानी कमानी आणि घुमट . शिवाय या शहरां च्या वेशी मोठ्या तटबंदीने सुरक्षित असत.
राजवाड्यांमधील भिंतीवरच्या तत्कालीन महत्वाच्या घटनांची चित्र काढली जात.
कालांतराने असिरीया शहराने आपले सामर्थ्य वाढवले.
या राज्याचे वैभव, श्रीमंती इतकी होती कि अनेक आक्रमकांना त्याचे आकर्षण होते. यातूनच इ स पाय ५४० च्या सुमारास पर्शियन राजाने मेसोपोटेमियावर आक्रमण केले आणि जिंकले . आणि अनेक वर्ष या परकीयांचे वर्चस्व मेसोपोटेमियावर राहिले.
कालांतराने हि संस्कृती नामशेष झाली. आणि इराकच्या वाळवंटाच्या वाळूत हि संस्कृती हरवून गेली. परंतु त्यांनी दिलेली लिपी, कायदे, खगोल, गणित यातील प्रगती हि सर्व संस्कृतीची वैशिष्ट्ये हि त्यांची मानवी समाजाला मिळालेली देन आहे.
अशा रीतीने पूर्वीचा रानटी- हंटर गॅदरर- माणूस केवळ शेतकरी झाला असे नाही तर त्याच बरोबर अनेक कौशल्य करणारा हि बनला. शेतकरी, बांधकाम करणारा, कारागीर, सुतार, चित्रकार, शिल्पकार, पुजारी, शिक्षक, राजा, युद्ध करणारा सैनिक आणि लेखन कला असणारा लेखकही.